दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
नांदेड जिल्ह्यांमध्ये किनवट राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातामध्ये ५ जण जागीच ठार झाले तर यामध्ये मूळचे बिहारमधील असलेले ४ मजुरांसह एक ट्रक चालकांचा समावेश आहे. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारांस घडली. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यांत आले. हा बघा तेवढा भीषण होता की आयशर टेम्पोच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला होता या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी काही वेळ ठप्प झाली होती. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्यांची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्वजण बिहार येथून उदरनिर्वाह करण्यासाठी नांदेड जिल्ह्यांमध्ये आले होते. नांदेड शहरांत सध्या रेल्वेच्या विद्युतकरणांचे काम युद्ध पातळीवर सुरु असून हिमायतनगर परिसरातून काम करुन हे मजूर टेम्पोतून परतत असताना विद्युत लाईनचे साहित्य घेवुन भोकर येथे जात होते होते. यादरम्यान हिमायतनगर तालुक्यातील सोनेरी फाटा येथे आयशर टेम्पोला( वाहन क्रमांक एम एच २६ जे ००१६ ) या भरधाव वेगातील सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात ५ मजुरांवर काळाने घाला घातला. तर ५ जण गंभीर जखमी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर साहेब व त्यांचे पोलीस सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.