दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – संभाजी गोसावी
पुणे. पिंपरी-चिंचवड परिसरांमधील निगडी भागांतील गंगानगर या परिसरात राहणाऱ्या युवतीवर ३ ते ४ नराधमांनी अत्यंत कुरपणे पद्धतीने व मनावतेला लाजवेल असे कृत्य केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर चांगलेच हादरले. युवतीच्या अंगावर दारू ओतून नंतर तिच्या तोंडात मिरची पावडर कोंबून व नंतर या युवतीच्या शरीरांवर व गुप्त भागांवर दारु ओतून ब्लेड वार केले. या घटनेबाबत युवतीच्या बहिणीने निगडी पोलीस ठाण्यांत धाव घेत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी एका आरोपीला अटक करुणांनी आरोपींची शोध मोहीम सुरु आहे.या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन दिनांक २२ सप्टेंबरला घडली असुन पीडित युवती ही रोडवरुन जात होती. ती कणीस घेण्यासांठी एका ठिकाणी थांबले असता. त्यावेळी काही तरुण तिथे आले व त्यांच्या हातात कोयते होते. त्यामधील एका आरोपीने हिला पकडा म्हणाला त्याचा आवाज ऐकून पीडित युतीने तिथून धूम ठोकली. तिने स्वतःच्या सुरक्षेसाठी जवळील असलेल्या सार्वजनिक शौचालयांचा आधार घेतला. मात्र तिला पकडण्यांत आरोपींना यश आले व त्यानंतर त्या चार नरधामांनी तिच्यावर अत्याचार केला. या घटनेबाबत युवतीच्या बहिणीने निगडी पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली. पीडित युवतीच्या बहिणीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी एका आरोपीला अटक केली तर अन्य आरोपींचा शोध निगडी पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड-निगडी परिसरांत दहशतीचे वातावरण चांगलेच निर्माण झाल्यांचे दिसून आले.