दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी:-राम चिंतलवाड
… हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्गावरील करंजी ते सोनारी फाटा दरम्यान वेअरहाऊस समोर ट्रक आणि आयचरची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात पांच जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री ७.४५ च्या सुमारास घडली आहे. आयचर मध्ये येणारे मजुर हे ईस्लापुर परीसरात रेल्वेचे लाईन चे काम करणारे मजूर होते.पॅसेजर रेल्वे भेटली नसल्यामुळे मजुर भोकर ला सोडण्यासाठी आयचर जात होता.तर ट्रक भोकर कडुन हिमायतनगर कडे येत असताना हा भिषण अपघात झाला. या अपघातात बिहार येथील आठ कामगार मजुरापैकी तिनं मजकुरासह आयचर चालक प्रकाश गीमेकर (फुलेनगर) हिमायतनगर, भोकर तालुक्यातील रेणापुर येथील ट्रक चालकाचा समावेश आहे…..हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्गावरील करंजी ते सोनारी फाटा दरम्यान वेअरहाऊस समोर ट्रक आणि आयचरची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक आणि आयचर मधील बिहारचे आठ कामगार मजूर पैकी तिनं मजुर,चालक, एक ट्रक चालक असे पाच जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान झाली आहे. इस्लापूर येथून भोकर कडे जाणारा MH 37 j 0016 आयचर जात असतांना अचानक तर ट्रक क्र MH 26 BE 1011 भोकर कडुन हिमायतनगर कडे जाणाऱ्या ट्रक या .दोन्हिही वाहनांची आमनेसामने धडक होऊन झालेल्या अपघातात बिहार येथील आठ पैकी तिनं मजुर तर भोकर तालुक्यातील एक ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाला असून अन्य मजुर जखमी झाले आहेत घटना स्थळी पोलीस निरीक्षक बि. डी भुसनुर, सहायक पोलीस निरीक्षक महाजन, यांच्यासह पोलीसांनी घटना स्थळी भेट देऊन गंभीर असणाऱ्या रूग्णांना उपचारासाठी पाठविण्यात आले आसल्याचे सांगितले आहे.