दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- वाकवड येथील केंद्रीय शिक्षण परिषदेस उपशिक्षणाधिकारी सागंळे यांनी सदिच्छा भेट दिली. भूम केंद्र अंतर्गत सर्व शाळेतील शिक्षकांची तिसरी केंद्रस्तर शिक्षण परिषद जि.प.प्रा.शाळा वाकवड शाळेत घेण्यात आली.या शिक्षण परिषदेस निरीक्षक म्हणून जि.प.उस्मानाबादचे उपशिक्षाणाधिकारी सागंळे यांनी भेट देवून मार्गदर्शन केले.त्यांनी मुलभूम अध्ययन स्तर भाषा व गणित या विषयी राबवायचे विविध उपक्रम सांगितले. त्यामध्ये परमवीर चक्र विजेते, शास्त्रज्ञांची जयंती, वर्ल्ड कप,क्रीडा पुरस्कार विजेत्या,
निसर्ग सहल,सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न परिपाठात,ग्रंथालय समृद्ध करणे ,वाचनाला प्रेरणा देणे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.या प्रसंगी वाकवड शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कुटे व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.