दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:-उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलच्या जिल्हा उपध्यक्षपदी प्रभाकर डोंबाळे यांची उस्मानाबाद काँग्रेस भवन येथे बैठकीमध्ये निवड करण्यात आली. प्रभाकर डोंबाळे यांचे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यावेळी निवडीचे पत्र राजेश राख मराठवाडा निरीक्षक ओबीसी काँग्रेस कमिटी , जिल्हा मा.अध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे ,काँग्रेसचे जिल्हा संघटक राजेभाऊ शरखाने ,ओबीसीचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत , नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, सौरभ गायकवाड ,विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष वाशी तालुका अध्यक्ष अमोल बोडके, परंडा तालुका अध्यक्ष महावीर इतापे, सरपंच परिषदेचे प्रदेश संघटक कोहिनूर सय्यद, अण्णा कोळेकर, सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.