दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
दैनिक युवा राज्य तर्फे गणराज पॅलेस नांदेड येथे देगलूर तालुक्याचे युवा राज्य तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार यांना युवा पत्रकार पुरस्कार 2022 सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अजित पाटील संपादक दैनिक युवा राज्य, आवृत्ती संपादक दैनिक युवा राज्य गणेश अनंतराव शिंदे व आजाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या उपस्थितीत युवा पत्रकार 2022 चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी देगलूर तालुक्यातील प्रेस पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष संतोषराव मन धरणे, बाळकडू चे देगलूर तालुका प्रतिनिधी ईश्वर राव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रासपा तालुका अध्यक्ष मलिकार्जुन कडलवार, सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील खानापूरकर व गजानन गज्जलवार वळगकर आदी उपस्थित होते.