दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
पत्रकारिता क्षेत्रातून सर्वसामान्यांचे प्रश्न व त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून सतत कार्यशील असलेले पत्रकार विलास शेरे यांना या उत्कृष्ट कार्याबद्दल दैनिक युवाराज्य परिवाराकडून युवा पत्रकार पुरस्कार नुकताच दिला असून सदर पुरस्काराचे वितरण नांदेड येथील गणराज पॅलेस येथे दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी झाला आहे .
बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले पत्रकार हे अनेक सामाजिक कार्यात आपला सहभाग घेत असतात त्यांनी आपल्या वृत्तपत्रातून तळागाळातील सर्व सामान्य माणसांना प्रसिद्धी दिली असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दैनिक युवाराज्य परिवाराकडून दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी नांदेड नमस्कार चौक येथील गणराज पॅलेस येथे जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी,आजाद ग्रुपचे अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
नांदेड येथील तहसीलदार किरण आंबेकर, महसूल अधिकारी शिवसांभ दापकेकर,लोहा येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे,पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे,आझाद ग्रुपचे उपाध्यक्ष प्रमोद टाले,कोनाले कोचिंग क्लासेसचे संचालक योगेश कोनाले,दैनिक युवाराज्याचे संपादक अजित पाटील,आवृत्ती प्रमुख प्रा.गणेश पाटील शिंदे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत युवा पत्रकार पुरस्काराने पत्रकार विलास शेरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या सदर पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.