दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- मौजे पेठवडज तालुका कंधार येथील असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्याची प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करण्यात आलेली नसून ती पूर्ण करण्यात यावी.याअगोदर या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी जाधव हे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर उपोषणास बसले.तरीही आजपर्यंत मराठवाडा मसुल आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही कुठलाच विचार केला नाही; तरी जनतेची होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जाधव व्यंकटी यांनी मा.आयुक्त मराठवाडा मसुल आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे केली आहे.