दैनिक चालू वार्ता लोहा ग्रा प्रतिनिधी- राम कराळे. . . .
लोहा: कृषि विभागाच्या स्मार्ट मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन (स्मार्ट)प्रकलप (जागतिक बॅक सहाय्यित उपक्रम) आत्मा लोहा अंतर्गत *स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत साई शिवेंद्र शेतकरी उत्पादक कंपनी दगडगांव.ता.लोहा. येथे मुल्य साखळी विकास शाळा पिक सोयाबीन शेतीशाळेमध्ये सोयाबीन पिक शेतीशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे .कृषि विभागाच्या धोरणानुसार सोयाबीन पिकांमध्ये शेतक-यांना प्रत्यक्ष शेतावर सोयाबीन पिकातील विविध अवस्थेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सोयाबीन शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.*
सेवा पंधरवडा अंतर्गत कृषि विभागाच्या वतीने रविशंकर चलवदे प्रकल्प संचालक नांदेड , श्रीमती माधुरी सोनवणे प्रकल्प उपसंचालक ,अरुण घुमनवाड नोडेल अधिकारी स्मार्ट, संदानद पोटपेलवार, तालुका कृषि अधिकारी लोहा, यांच्या तसेच (रिसोर्स फार्मर)प्रगतिशील शेतकरी मारोती गंगाधर मोते यांच्या मार्गदर्शनाखाली आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल सय्यद यांनी मौजे दगडगांव येथे शेतीशाळेचे आयोजन केले आहे.
*स्मार्ट अंतर्गत आयोजन : सोयाबीन पिकाविषयी एकूण पाच सत्र शेतीशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत यामध्ये १) पेरणीपूर्व २) पेरणी व रोपावस्था, ३) शाखीय वाढ व फुलोरावस्था,४)शेंगा लागणे व पक्वता, या चार सत्रामध्ये शेतकर्याना माहिती देण्यात आली.व उर्वरीत सत्रामध्ये ५)काढणी व काढणीपश्यात तंत्रज्ञान, प्रतवारी व साठवणूक, प्रक्रिया उद्योग विक्री व्यवस्था याबाबत माहिती दिली जाणार आहे.व चोथे सत्र शेंगा लागणे व पक्वता,आयोजित झाले या मध्ये*
१)शेगा लागणे व पक्वता
सोयाबीन पिक परिसंस्था निरीक्षणे, चित्रीकरण, सादरीकरण, चर्चा व निष्कर्ष
२.लघु अभ्यास: विविध पिकावरील किड रोगांचे व्यवस्थापन, चंक्री भुगेरा, खोडमाशी,व किटकनाशंकाचा आर्थिक वापर व किटकनाशंकाचा मानवी जीवनावर होणारे परीणाम
३.विशेष विषय: जास्त व खंडीत पावसाच्या वेळी घ्यावयाची काळजी.
४.लघु प्रयोग : बिजोत्पादन , निंबोळी अर्क तयार करणे.
५.पिक कापणी प्रयोग ,शेतीशाळा प्रशिक्षक मन्मथ गवळी, कृ.प.एल.एम.हांडे साहेब ,(रिसोर्स फार्मर) प्रगतिशील शेतकरी मारोती गंगाधर मोते यां सर्वानी मार्गदर्शन केले.
यावेळी आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल सय्यद यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या पुढच्या सत्रबाबत माहिती दिली.
या शेतीशाळेस दगडगांव येथील श्री. भाऊसाहेब ढवळे, मारोती डक सुर्य वंशी , सौ.जिजाबाई मोते, सौ.राधाबाई डक, सौ.लक्ष्मी नवरे,व श्री. दिगंबर पाचाळ,पांडुरंग मोते,मारोती कस्तुरे,बालाजी उराडे, इतर महिला शेतकरी व शेतकरी सदस्य उपस्थित होते.