दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : १९५० मध्ये गुजरातच्या वडनगर येथे जन्मलेले नरेंद्र दामोदरदास मोदी, आज जगभरात चर्चेत आहेत. अक्षय कुमारपासून कंगना रनौत, विवेक ओबेरॉय, अभिषेक बच्चन आणि अनेक सेलिब्रिटींनी पंतप्रधानांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! आणि देशभरातील अनेक लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.अनेक बॉलिवूड सेलेब्सनीही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूडचा अक्षय कुमारने लिहिले की,तुम्ही नेहमीच मला प्रोत्साहन दिले आणि खूप आशीर्वाद दिले. मी तुमच्यासारखे लिहू शकत नाही, परंतु आज मी तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा देतो. निरोगी राहा, आनंदी राहा, देवाकडे तुमच्यासाठी हीच इच्छा आहे.
नेहा धुपिया
पीएम मोदींना शुभेच्छा देताना बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने ट्विटरवर लिहिले की, आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्या जीवनात आरोग्य आणि आनंद कायम राव्हो.
अभिषेक बच्चन
अभिनेते अभिषेक बच्चन यांनी लिहिले,आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला उज्ज्वल भविष्य आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.
कंगना रनौत
बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि त्यांचे काही फोटो शेअर केले. कंगनाने लिहिले की, जगातील महान नेते नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
विवेक ओबेरॉय
अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी लिहिले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, भारताची संस्कृती आणि भारताचे तंत्रज्ञानाच्या संगमाने भारताला जागतिक गुरु बनवणारे युगपुरुष..देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो आणि नेहमी निरोगी राहा.. जय हिंद.