दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची राज्यातील ताकत कमी करण्यासाठी काही अपप्रवृत्तीचे लोक व संघटना अफवा पसरत आहेत की दसरा मेळावा यावर्षी भगवान गडावर होणार आहे. परंतु या अफवा असून स्व.गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा दि. 05ऑक्टोबर 2022 रोजी बुधवारी विजयादशमीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे भगवान भक्ती गडावर सुपे सावरगाव ता. पाटोदा जि. बिड येथे होणार आहे. यासाठी दि.25 सप्टेंबर 2022 रोजी उत्सव हॉटेल, ठाणे येथे मुंबई, ठाणे येथील दसरा मेळावा कमिटीचे वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
पंकजा मुंडे यांना ऐकण्यासाठी, त्यांचे हात बळकट करण्यासाठी व मुंडे साहेबांचे नाव जिवंत ठेवण्यासाठी ठाणे, मुंबई, कल्याण, पालघर, रायगड व बदलापूर येथील 15 हजार समाज बांधव भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी जाणार आहेत. तसेच सर्व समाज बांधव पंकजाताई यांचे सोबतच आहे असा निर्णय मुंबई, ठाणे येथील दसरा मेळावा कमिटीने घेतला आहे. असे अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष धनराज गुट्टे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले.
यावेळी सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक अमोल गीते, स्व. वऱ्हाडी मिसळचे संचालक गजानन आंधळे, शिवाजी वाघ, संदीप चकोर, दौंड साहेब, गोविंद केदार, सहदेव जायभाये सह समाज बांधव उपस्थित होते.
स्व.गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर सुरू केलेला दसरा मेळावा गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर भाषण बंदी घातल्यामुळे भगवान गडाचे पायथ्यावर भाजपाने त्या पंकजा मुंडे यांनी घेण्यास सुरुवात केली. कालांतराने होणारी चर्चा व इतर लोकांचा यावर असणारा द्वेष पाहून पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगाव घाट ता. पाटोदा जिल्हा. बीड येथे घेण्यास सुरुवात करून दसरा मेळाव्याची परंपरा सुरूच ठेवलेली आहे. त्यामुळे 05ऑक्टोबर 2022 रोजी बुधवारी विजयादशमीच्या निमित्ताने सुपे सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी राज्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धनराज गुट्टे यांनी केले आहे. तसेच दसरा मेळाव्यापुर्वी धनराज गुट्टे राज्यभर दौऱ्यावर असून ते समाज बांधवांच्या बैठका घेत व पंकजाताई यांची राजकीय ताकद वाढवत आहेत.