दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
लोहा:- लोहा तालुक्यातील नांदगाव चिंचोली येथे दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी पासून श्री संत शिरोमणी सद्गुरू समर्थ श्री बाळगीरी महाराज यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठान श्री संत गुरुवर्य जयगीरी महाराज व किशनगीर महाराज यांच्या१५ व्या पुण्यतिथी बीज कार्यक्रम व अखंड दत्तनाम या अष्टपहाऱ्याला रोज १२८ भक्त दत्त नाम म्हणणार आहेत. व संत बाळगीर महाराज तसेच जयगीर महाराज यांचे जीवन चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री संत शिरोमणी सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठान संत जयगीरी महाराज व गुरु किशनगीरी महाराज यांची पंधरावी पुण्यतिथी बीज व चारित्र्य पारायण सोहळा दिनांक २९ सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत अखंड दत्तनाम
अष्टपहारा व भजनी मंडळ यांच्या विविध कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. दिनांक ४ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा खंडी तांदळाची महापूजा संपन्न होईल त्यानंतर दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता संत बाळगीर महाराज मूर्ती मिरवणूक व गुरु जयगीरी महाराज पालखी मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्यांनी निघेल व श्री संत बाळगीर महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठान करून दोन्ही मूर्तींचा अभिषेक करण्यात येईल. या नंतर लगेचच महाप्रसादाचा कार्यक्रम होईल या कार्यक्रमाचे संयोजक श्री संत समगिरी गुरु जयगीरी महाराज, श्री अवधूतगिरी गुरु जयगीर महाराज, श्री संत दत्तगीर गुरु आनंदगिरी महाराज, श्री संत निरंजन गिरी गुरु समगीर महाराज व समस्त गावकरी मंडळी नांदगाव चिंचोली व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान केले आहे.