
दैनिक वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
KD ग्रुप आयोजित आंबिवली (खडकीपाडा) येथे दिवाळीच्या निमित्ताने विविध स्पर्धा, बक्षीस वितरण, सत्कार समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
सदर विविध स्पर्धेमध्ये वकृत्व (भाषण) स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि पत्रलेखन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत आंबिवली गाव आणि त्यांच्या आजूबाजूच्या गावातील लहान मुलांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत ई २ री ते ४ थी, ५ वी ते ८ वी आणि ९ वी ते १२ वी असे तीन गट तयार करण्यात आले होते. या तीन गटातून प्रथम, दृतीय आणि तृतीय क्रमांक काढून त्यांना मान्यवरांच्या हस्ते KD ग्रुप कडून प्रमाणपत्र आणि बक्षीस म्हणून वही आणि पेन देण्यात आले. तसेच ज्या मुला – मुलींनी गेल्या वर्षी ई १० वी व ई १२ वी या वर्गात पास झालेल्या म्हणून त्यांचा ही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आताच नियुक्त झालेले पालघर पोलीस श्री. अनिल धांगडा आणि पुणे येथे रेल्वे स्टाफ म्हणून आताच नियुक्ती झालेले श्री. उमेश खडके उपस्थित होते. त्यांनी जमलेल्या सर्व मुलांना आणि पालक वर्गाला खूपच सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शाळकरी मुलांनी खूपच उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला होता. सर्वांनी खूपच छान आपापल्या मध्ये असणारे टेलेंट यांनी या कार्यक्रमात दाखवले होते.
सदर कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश म्हणजे मुलांमधील स्टेज वर बोलण्याचा आत्मविश्वास वाढवा आणि आपल्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळावा हाच उद्देश होता.
या कार्यक्रमात आंबिवली, निकावली तसेच आजूबाजूच्या गावातील उपस्थित मुले – मुली व आई – वडील सारखी वडीलधारी पालक वर्ग उपस्थित होता. तसेच KD ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा सर्व कोविड नियमांचे पालन करून पार पडलेला आहे.