दैनिक चालु वार्ता पुणे जिल्हा उपसंपादक -शाम पुणेकर.
पुणे: शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर पीएमपी प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. नियोजन करूनही वेळेत बस मिळत नसल्याची कैफियत मांडली जात आहे. या मार्गावर “पुण्यदशम’ बस सुरू असल्या, तरी त्यांची क्षमता कमी आहे. त्या स्वारगेटलाच पूर्ण भरत असल्यानेच पुढील थांब्यांवरील प्रवाशांचे हाल होत आहेत.
बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमपीने मोठ्या दहा बसचे मार्ग बदलले आहेत. यामुळे बाजीराव रस्ता परिसरात जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्यानंतर पीएमपी या मार्गावर “पुण्यदशम’ बस वाढविल्या, तरी प्रवाशांना थांब्यावर अर्धा-आर्धा तास बसची वाट पाहत थांबावे लागत होते. पुण्यदशमच बस लहान असल्यामुळे त्यामध्ये गर्दी होऊन प्रवाशांनाचे हाल होत होते. त्यानंतर पीएमपी कमी केलेले चार मार्ग पुन्हा बाजीराव रस्त्यावरून सुरू केले होते. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला.
वाहतूक कोंडी “जैसे थे’
बाजीराव रस्त्यावर सध्या “पुण्यदशम’च्या बसेस तसेच, मार्केटयार्ड ते पिंपळे गुरव, कात्रज गुजरवाडी या फेऱ्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते.