दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
चंद्रपूर
1 ऑक्टोंबर पासुन चंद्रपूरात आयोजित महाकाली महोत्सवा निमित्त बेटी बचाओचा संदेश देण्यासाठी नवरात्रो उत्सवादरम्यान जन्मास आलेल्या कन्यांना भेट स्वरूपात चांदीचा सिक्का देण्याचा निर्णय महाकाली सेवा समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. सदरहु सिक्के माहेश्वरी सेवा समितीचे अध्यक्ष सि.ए. दामोदर सारडा यांनी देण्याची ही घोषणा केली आहे.
चंद्रपूरचे अराध्य दैवत माता महाकाली व येथील मंदिराची प्रचिती राज्यभरात पोहचविण्यासाठी चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन तथा माता महाकाली भक्तांच्या वतीने स्थापण करण्यात आलेल्या माता महाकाली सेवा समितीच्या वतीने येत्या 1 ऑक्टोंबर पासुन माता महाकाली मंदिर पंटागणात चार दिवसीय भव्य श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सावत प्रसिध्द जागरणकार, गायीका, भजन मंडळे, कथा वाचक सहभागी होणार आहे. सदरहु महोत्सवा दरम्यान बेटी बचाओचा संदेश देण्यासाठी नवरात्रोत्सव दरम्यान चंद्रपूरात जन्मास येणा-या कन्यांना भेट स्वरूपात चांदीचा सिक्का देण्याचा निर्णय माता महाकाली सेवा समितीच्या वतीने घेण्यात आला होता. त्यानंतर सदरहु सिक्के देण्याची जबाबदारी ही माहेश्वरी सेवा समितीचे अध्यक्ष सि.ए. दामोदर सारडा यांनी स्विकारली आहे. सदर सिक्के महाकाली महोत्सवा दरम्यान मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. 26आॅक्टोबर ते 4 आॅक्टोंबर या नवरात्रो उत्सवा दरम्यान चंद्रपूरात जन्मलेल्या कन्यांच्या पालकांनी महाकाली मंदिराच्या कार्यालयात किंवा महाकाली महोत्सव सेवा समितीच्या मंडपात संपर्क साधण्याचे आवाहन माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार जोरगेवार यांनी केले आहे.