दै.चालु वार्ता /
मध्य-औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी /
अनिकेत संजय पुंड
औरंगाबाद : – श्री सन्मिञ गणेश मंदिर , देशमुखनगर ‘ व ‘ महाकाल प्रतिष्ठाण , संभाजीनगर ‘ यांचा विशेष उपक्रम
देशावर ओढावलेल्या कोवीड-१९ च्या महामारी मधून नागरिकांची सुटका करण्यासाठी व महाराष्ट्राचे लाङके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या ‘ माझी कुटूंब , माझी जबाबदारी ‘ या अभियानाच्या माध्यमातून मोफत कोवीड-१९ लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .
महाकाल प्रतिष्ठाण , संभाजीनगर ची मराठवाङयातील सर्वात मोठे शिस्तबद्ध ढोलपथक अशी ओळख आहे . गणेश उत्सवा दरम्यान नेहमी शिस्तबद्धतेचे परितोषीक हे पथक मिळवते . परंतु कोवीड-१९ च्या नियमांचे पालन करून यंदाचा उत्सव भक्तीभावाने साजरा करण्याचे नियोजन झालेले आहे . हे वर्ष महाकाल प्रतिष्ठाण , संभाजीनगर ङ्क आरोग्य उत्सव ङ्क म्हणून विविध सामाजिक उपक्रम नियमांचे पालन करून साजरे करत आहे .
तसेच पहिल्या मोफत कोवीड-१९ लसीकरण शिबीराला नागरिकांनी उदंङ प्रतिसाद दिला . गणेश भक्तांचा उत्साह व आरोग्याची जबाबदारी पहाता उद्या पुन्हा मोफत कोवीड-१९ लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले .
उद्या १८ सप्टेंबर २०२१ ( शनिवार ) रोजी शहरातील सन्मिञ गणेश मंदिर , देशमुखनगर येथे मोफत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे . त्या मध्ये ज्या नागरिकांचे १ ला डोस किंवा २ रा डोस जे कोणते लसीकरण बाकी असल्यास खालील लिंक वर जाऊन त्वरित आपले रजिस्ट्रेशन करावे . लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे . काही मदत हवी असल्यास पुढील नंबर वरती संपर्क करावा – ९१३०८३५४२०
जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबीरात लसीकरण करून घ्यावे असे आव्हान महाकाल प्रतिष्ठाण , संभाजीनगर व श्री सन्मिञ गणेश मंदिर , देशमुखनगर च्या आयोजकांनी केलेले आहे .