दैनिक चालू वार्ता शिराढोण सर्कल प्रतिनिधी- लक्ष्मण कांबळे
उस्माननगर येथील देशपांडे
परिवारातील संस्थानिकांच्या उज्ज्वल परंपरा सांभाळत बालाजी संस्थान परंपरेनुसार आजतागायत धार्मिक, वैदिक पद्धतीने साजरा केला जातो.
आश्विन शुद्ध प्रतिपदा दिवशी घटस्थापना करण्यात आली असून दसरा पर्यंत दररोज नित्यनेमाने धार्मिक व वैदिक कार्यक्रम करण्यात येत आहेत.
यात सर्वग्रह जप अनुष्ठान, दहा दिवसांच्या उत्सवात एक लक्ष २५ हजार नवग्रह जप, महामृत्युंजय महामंत्र जप, राम सहस्र नाम, भवानी सहस्र नाम, व्यंकटेश सहस्र नाम, विष्णू सहस्र नाम, अशा सामुदायिक पठणाचे नित्य मंत्रोच्चार करण्यात येतो.
देशपांडे परिवारातील हा बालाजी संस्थान चा दसरा महोत्सव परिसरात प्रसिद्ध आहे.
देशपांडे परिवारातील सदस्य परंपरा सांभाळत हा महा उत्सव दरवर्षी मोठ्या आत्मियतेने, श्रद्धेने साजरा करतात.
नवमी व दशमीला जपांचे दशांत हवन, चार सहस्र नाम हवन, कुलाचार, होम आदीं कार्यक्रम यज्ञेश्वर महाराज, दूर्गादास महाराज,गजानन महाराज, चंद्रकांत महाराज आदींच्या उपस्थिती मध्ये होतात.
रोज रात्री श्रीमद्भागवत पुराण, व्यंकटेश पुराण, किर्तनाचे कार्यक्रम होतात. या सोहळ्यात देशपांडे परिवारातील नवीन पिढी सुद्धा दरवर्षी नवरात्र सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होत असते. हे विशेष.
गावातील बालाजी संस्थान देशपांडे परिवारासह गावकरी, परिसरातील भाविकांसाठी सुद्धा श्रद्धेचा अमुल्य ठेवा आहे.
—————————–