
दैनिक चालू वार्ता
पन्हाळा प्रतिनिधी शहाबाज मुजावर
पन्हाळा येथे पालकमंत्री सतेज पाटील यांचे हस्ते विकास कामांचे उदघाटन करण्यात आले
दलित वस्ती सुधार योजनेतील सर्वात चांगले काम करुन संपुर्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळवल्याचा अभिमान आसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दलित वस्ती सुधार योजनेतुन बांधलेल्या सभागृहाचे उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले त्यांचे हस्ते पन्हाळा पर्यायी रस्ता व नळपाणी पुरवठा योजना दलीतवस्ती सुधार योजनेतुन बांधलेल्या सभागृहाचे उदघाटन (समाज मंदिर) चे आसे उदघाटनाचे कार्यक्रम पार पडले यावेळी ना. पाटील यांनी, पन्हाळ्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. देशविदेशातून हजारो पर्यटक इथे येत असतात. इथल्या अनेक पराक्रमांचा, शूर-वीरांचा इतिहास समजून घेतात. पर्यटकांच्या सोयीसाठी लवकरच ई-टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार आहे. पन्हाळगडाला देशाच्या पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार डाॕ.विनय कोरे व यावेळी नगराध्यक्षा रुपाली धडेल उपनगराध्यक्षा पल्लवी नायकवडी, नगरसेविका सुरेखा भोसले, रुकसाना मुजावर नगरसेवक , फिरोज मुजावर, रविंद्र तोरसे, चेतन्य भोसले, सामाजिक कार्यकर्ते तय्यब शेठ मुजावर,, रविंद्र घडेल ,विजय पाटील, जीवन पाटील, मुख्याधिकारी, स्वरूप खारगे असे.मान्यवर हजर होते
पन्हाळ्याचा मुख्य रस्ता खचल्याने पन्हाळ्यावर येण्यासाठी बुधवारपेठ ते पावनगड कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी दलीतवस्ती सुधार योजनेतुन पालकमंत्री सतेज पाटील यांनी निधी दिल्याने हा रस्ता पुर्ण करणे शक्य झाले तर नळपाणी पुरवठा योजनेचे औपचारीक उदघाटन करण्यात आले यावेळी रस्ता,सभागृह व अन्य बांधकाम ठेकेदार हर्षद बच्चे, सचिन पाटील ,शिवाजी ढेरे ,यांचा सत्कार करण्यात आला
डाॕ.विनय कोरे यांनी पालकमंत्री यांचेकडे विवीध मागण्या केल्या यात पन्हाळा – जोतीबा रोपवेसाठी लागणारा निधी, पन्हाळा पाणी पुरवठा योजनेसाठी होणारा पन्नास लाख विज खर्च आणी पन्हाळ्यासाठी विवीध विकास कामात अग्रक्रम मिळावा अशी मागणी केली