दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
🔸नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सक्षम
अमरावती :-पाकिटमारी आणि मोबाईल चोरांवर वॉच ठेवण्यासाठी पोलीसांची पथके स्वतंत्रपणे तैनात करण्यात आली आहेत.अंबादेवी आणि एकवीरादेवी यात्रेत १ पोलीस उपायुक्त, २ एसीपी, ३९ पोलीस अधिकारी, ३६७ पोलीस कर्मचारी, एसआरपीएफच्या ५ तुकड्या आणि १९० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.नवरात्रोत्सवादरम्यान अंबादेवी येथे २४ तास पोलीसांचा पहारा असेल.अमरावतीवासीयांनी सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी केले आहे.नवदुर्गोत्सव काळात सर्वांनी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावा व पोलीसांना पूर्ण सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.