दैनिक चालु वार्ता वसमत प्रतिनिधी
समाजकल्याण व बार्टी शासनाच्या जणकल्याणकारी योजनेच्या बळावर मागासवर्गीय वंचित घटकातील विध्यार्थ्यांनी उच्च शिक्षणातून क्रांती घडवावी. असे मत समतादूत सुरेश पठाडे यांनी सामाजिक न्याय विभाग, बार्टी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने सेवा पंधरवाडा निमित्त वसमत येथील मार्गदर्शन शिबिरात बोलतांना व्यक्त केले .
दिनांक : 28 सप्टेंबर रोजी केंब्रिज महाविद्यालय वसमत येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, सेवा पंधरवाडा निमित्ताने ( दि.17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर ) या कालावधीत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तथा संशोधन अधिकारी श्री.शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम घेण्यात आला.
जातपाडताळणी मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचे केंब्रिज विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. जगताप पी.बी.हे उपस्थित होते. सामाजिक न्याय विभाग बार्टी चे समतादूत सुरेश पठाडे ,आळणे मिलिंद, प्रकल्प सहायक श्री. डी.पी. कांबळे, राहुल भराडे, मिलिंद आळणे, गुरुनाथ गाडेकर आदींची उपस्थिती होती.
समतादूत सुरेश पठाडे पुढे बोलतांना म्हणाले कि विद्यार्थ्यांनी समाजकल्याण व बार्टी शासनाच्या जनकल्याणकारी योजनेचा फायदा घेऊन .विद्यार्थांनी मेडिकल, इंजिनिअर सारख्या उच्च शिक्षणासाठी जात पडताळणी प्रस्ताव तात्काळ सादर करण्याबाबत समाजकल्याण जातपाडताळणीच्या वतीने सूचनाही देण्यात आल्या .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा..राजेगोरे ए. बी. यांनी केले . तर शेवटी आभार प्रा. टी. बी.मोहिते यांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी प्रा.पावरा व्ही. जी.,प्रा.ददगाळे व्ही.एम.,प्रा. चव्हाण आदी सर्व प्राध्यापक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.