दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
ईट येथे AISF कडूंन ११ वर्षापासुन वीर भगतसिंह यांची जयंती साजरी करण्यात येत
भूम:- तालुक्यातील क्रांतिकारांची ओळख असलेले ईट येथे गेली 11 वर्षापासून क्रांतिकार्यात बलिदानासाठी सर्वात पुढे असणारा नेता, निधड्या छातीने हौताम्याला सामोरे जाणारा देशभक्त, प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी, जहाल क्रांतिकारक अशी ओळख असणारे, युवकांचे प्रेरणास्थान, प्रेरणास्त्रोत शहीद वीर भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
ईट येथे AISF तर्फे वीर भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त शहीद भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी aisf भूम तालुका सचिव अजित माळी यांनी शहीद भगतसिंह यांच्या बद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त केले कॉम्रेड अशोक माने यांना कार्यक्रम आलेल्या मान्यवरांचे आभार करून भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास सुरुवात केली. आजोजित केलेल्या रक्तदान शिबिराला ईट येथील अनेक युवकांनी मोठ्या प्रमाणावर चांगला प्रतिसाद देऊन ईट मधील 41 युवकांनी रक्तदान केले. ह्या सर्व रक्तदात्याना AISF तर्फे भेट स्वरूपात थर्मास बॉटल देण्यात आली आहे.
यावेळी ईट गावचे ग्रामपंचायत सदस्य सुनील भैय्या देशमुख,वीर भगतसिंह अकॅडमी संचालक प्रताप भैया देशमुख, मा सरपंच प्रवीण देशमुख, ग्राम.पंसदस्य सयाजी हुंबे,स्वाभिमानी आनंद डोके,काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे समीर काझी aisf चे जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड अशोक माने ,फकीरा दलाचे अध्यक्ष बाबासाहेब थोरात, अक्षय काळखैर,सागर भालेराव, पत्रकार बंधू समाधान डोके, फैसल भैया काझी आणि ह्या शिबिराला यशस्वी करण्यासाठी aisf ईट शहर सचिव कॉ. प्रेम भागवत, कोषाध्यक्ष कॉ. पुरुषोत्तम चव्हाण, aisf भूम तालुका कॉ. सचिव अजित माळी, उपाध्यक्ष क्रांतीसिंह राऊत, माजी अध्यक्ष कॉ. बाळासाहेब हुबे, सहसचिव मयूर पवार, आयुब शेख, मा अध्यक्ष सूरज वेदपाठक, नागराज उंबरे, विकास खवळे, शिबिराला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतला व सर्व राजकीय पदाधिकारी, aisf पदाधिकारी गावकरी मंडळी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभा वाढवली.