दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मांदाटणे सरपंच श्री.चंद्रकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती म्हसळा पशुधन विकास अधिकारी (वि) डॉ.किशोर सरगर, म्हसळा तहसील खामगाव मंडळ अधिकारी सलीम शहा, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना श्रीवर्धन डॉ.ए.ए.कांबळे, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय डॉ.प्रशांत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मांदाटणे पंचक्रोशीतील भारत देशामध्ये लम्पी आजाराने ग्रस्त पशु यांचे संरक्षण करण्यासाठी व कोणत्याही प्रकारचे लम्पी रोगाची लागण होऊ नये म्हणून सर्व गुरांना लसीकरण करण्यात आले. तसेच या आजाराबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य भिकू डोंगरे, सौ.धनश्री मुंडे, सहाय्यक प.वि.अधिकारी डॉ.व्ही.ए.म्हापणकर, संदेरी पि.डी.बुलबुले, खामगाव डॉ.व्ही.जी.राठोड, पशुसंवर्धन विभाग सुनील कांबळे, प्रभाकर मोरे, महादेव नाक्ती, स्वदेश फाउंडेशनचे अरुण कोल्हे, केतन चव्हाण, ग्रामसेवक पी.बी.ठाकरे यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चंद्रकांत पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.