दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
पंकजा मुंडे यांनी नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सचिव प्रवीण घुगे यांनी दिली आहे. घुगे यांनी बुधवारी दसरा मेळाव्याच्या तयारी बाबतची माहिती देण्यासाठी बुधवारी पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेतली. या वर्षीच्या मेळाव्यात विक्रमी गर्दी होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
भगवान भक्तीगड श्री क्षेत्र सावरगाव (घाट) भगवान बाबा यांच्या जन्म गावी प्रति वर्षी प्रमाणे या वर्षीचा दसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळावा कृती समितीचे संयोजक प्रवीण घुगे यांनी सागितले की दिवंगत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांची दसरा मेळाव्याची परंपरा अखंड ठेवत, लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या श्री क्षेत्र सुपे सावरगाव (घाट) येथील श्री भगवान बाबा भक्ती गडावर या वर्षीचा दसरा मेळावा पार पडणार आहे.
दसरा मेळाव्यामध्ये राज्यभरामधून व परराज्यातून देखील अनेक भाविक मोठ्या भक्ती भावाने या मेळाव्यास उपस्थित राहत असतात. सर्व ठिकाणाहून येणाऱ्या भक्तगणांना भगवान भक्ती गडावर विविध सामाजिक उपक्रम व सामाजिक संदेश पर भाषण व आगामी काळामध्ये सामाजिक वाटचालीची दिशा देणारे भाषण म्हणून जनतेला मेळाव्याची उत्सुकता असते.
दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी विविध सामाजिक प्रश्न हाताळले आहेत. या मेळाव्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने, उस्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी नवनाथ महाराज आंधळे सतीश नागरे, सूर्यकांत अंबरवाडीकर, राम बुधवंत यांची उपस्थिती होती.