दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-नवरात्र उत्सवाला सुरवात झाली आहे.अश्यातच अंजनगाव सुर्जी-दर्यापूर मतदार संघांचे आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते अंजनगाव सुर्जी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाचे उदघाटन केले.आमदार बळवंत वानखडे म्हणाले की,स्त्री हे देवीचे रूप मानल्या जाते म्हणून महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या व तपासणी या अभियान काळात करण्यात येणार आहे.तसेच आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सुविधाही देण्यात येणार आहे आणि याकरीता महिलांनी आपल्या नजीकच्या उपकेंद्रात जावून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आमदार बळवंत वानखडे यावेळी म्हणाले.तसेच या कार्यक्रमावेळी महिलांनी मोठया संख्येने प्रतिसाद दिला.
या अभियान उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक मोरे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य विदर्भकुमार बोबडे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधिर डोंगरे,अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णलाय वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नालट,सरपंच पुरुषोत्तम घोगरे,कलीमभाई,सलामुद्दीन,जहिर बेग,अशीक अन्सारी,रमेश सावळे,विनोद हाडोळे,दिलीप खडगे,शिवदास यावले, आदी मान्यवर तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते