दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
मुंबई. राज्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली प्रतिक्रिया सध्या महाराष्ट्र शासनांतर्फे विविध पातळीवर सुरु असुन यांमध्ये ३१ ऑक्टोंबर २०२० पर्यंत बदली झालेले पोलीस उप आयुक्त ते पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक अशा एकूण ७७ अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून यादी मधील अधिकाऱ्यांकडून पसंतीचे तीन ठिकाणी प्रधान्य क्रमानुसार नमूद करुन विनंती अर्ज १९ सप्टेंबर २०२२ पर्यंत शासनाकडे पाठविण्यांस सांगितले होते विनंती अर्ज मध्ये नमूद ठिकाणीच बदली मिळेल की नाही याचा निर्णय प्रशासकीय निवडणुकीनुसार घेण्यांत येईल. या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत बदली होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत राज्यांतील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे या अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त विश्वांस नांगरे पाटील, पुण्यांचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता, अमरावतीच्या आरती सिंह, नागपूरच्या आयुक्त आमितेश कुमार यांची चर्चा असून राज्यांतील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या गृहमंत्र्यांकडूंन येत्या काही दिवसात बदली मिळण्याची चर्चा चांगली सुरू आहे तसेच सेवाकाळ पूर्ण झाल्यांमुळे अनेक पोलीस अधिकारी आपल्या ट्रान्सफर ऑर्डरची वाट बघत आहेत. २३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या १८ सप्टेंबर २०२० रोजी केल्या होत्या. बदली झालेल्यांचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होत असल्यांने आता आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या महिन्याअखेरीस होण्यांची सध्या पोलीस प्रशासन विभागांमध्ये चर्चा आहे. २०२० नंतर राज्यांत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय मात्र वादग्रस्त ठरत गेला होता. बदलांच्या निमिंत्ताने कोट्यावधीची डील झाल्यांचा आरोपही झाल्यांने आणि या आरोपाची केंद्रीय संस्थेकडूंन कसून चौकशी झाल्याने गेल्या दोन वर्षांत अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय टांगणीवर राहिला होता. तसेच आताही २३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या नेमक्या कुठे होणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यांत आहे. तरी निर्वाचित राज्य सरकारच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना झुकते माप मिळण्यांची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन दिवसांत बदलांच्या आदेश जारी करण्यांत येणार असल्यांची माहिती महाराष्ट्र राज्य गृह विभागाकडूंन देण्यांत आली आहे.