दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एमएसआरडीसीने १७२ कि.मी. लांब आणि ११० मी. रुंद रिंगरोड प्रस्तावित केला आहे. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागात विभागण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील ११ गावे, खेडमधील १२ गावे, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळ तालुक्यातील सहा गावांचा समावेश आहे. मावळ, मुळशी, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधून हा प्रकल्प प्रस्तावित आहे.
दरम्यान, मावळ, मुळशी, हवेली, भोर, खेड आणि पुरंदर तालुक्यांतून पूर्व आणि पश्चिम वर्तुळाकार रस्ता जात आहे. या प्रकल्पात ८३ गावे बाधित होणार आहेत. त्यातील ७७ गावांतील मोजणी पूर्ण झाली आहे. भूसंपादनासाठी आवश्यक पहिल्या टप्प्यातील २५० कोटी रुपये मंजूर झाले असून हा निधी प्राप्तही झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यात चालू बाजार मूल्यदर रेडीरेकनर प्रमाणे गेल्या पाच वर्षांत झालेले व्यवहारही पूर्ण झाले.