दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””‘”””””””””””””””””””'””””””””””””””
परभणी : शहरापासून बावीस कि.मी. अंतरावरील हट्टा पोलीस ठाण्यातील मुख्य अधिकारी पदाचा कार्यभार श्री. गजानन बोराटे यांनी स्वीकारला आहे.
वसमत शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी कर्तव्य बजावलेले गजानन बोराटे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सदैव सलोखा राखण्याचा केलेला प्रयत्न निष्ठापूर्वक असाच म्हणावा लागेल. वाणीने मृदुभाषी व समन्वयाची भूमिका साधणारे बोराटे साहेब कर्तव्यात कठोरता व तत्परता नि समय सूचकता सांभाळणारे सुध्दा असल्याचे समजते. मानवीय सलोखा राखताना कायदा व सुव्यवस्थेला कोणताही बाधा येणार नाही, यांची ते पूर्णपणे काळजी घेतात असाही बोलबाला आहे.
अंगी असलेला सोज्वळपणा कायम राखत कर्तव्यात तसूभरही ते डळमळीत नाहीत अशी त्यांची ख्याती असून खाकी वर्दीची आन बान व शान राखताना प्रसंगी कठोर भूमिका घेणे भाग पडले किंवा कायद्याचा अंमल करतांना वरिष्ठांच्या विश्वासार्हतेला तडा जाईल असे कोणतेही प्रकार होणार नाहीत, यांची ते सदैव काळजी घेतात हे त्यांच्या कृतीतून सदैव दिसत असते.
कर्तव्यकाळात त्यांनी अनेक धाडशी कारवाया केल्याचा बोलबाला आहे. वरिष्ठांचा मान राखत कार्यक्षेत्रातील प्रत्येकाशी ते समन्वयाने वागत असतात अशी वदंता असलेले श्री बोराटे हे नावाप्रमाणेच श्री गजाननाशी सदैव नतमस्तक होताना आढळून येते. हट्टा पोलीस ठाण्यातील सेवाकार्य निष्ठेने पार पाडण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहातील यात तिळमात्र शंका नाही. त्यांच्या यशस्वी वाटचालीस दैनिक चालू वार्ता तर्फे मनस्वी सूयश चिंतून त्यात त्यांना भरीव यश लाभले जावे हीच श्रीचरणी विनम्र प्रार्थना !
त्यांच्या नियुक्तीने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असून जोमाने स्वागतही केले जात आहे.