दैनिक चालू वार्ता शिराढोण सर्कल प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
समता माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर (मोठीलाठ ) ता कंधार जि नांदेड येथील वरिष्ट लिपिक संभाजी जळ्बाजी कांबळे हे 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवनंतर 30 सप्टेंबर 2022 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
शांत, मनमिळाऊ, सुस्वभावी,व फुले,शाहु आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी तथा अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्याच्याकडे बघितले जाते ते दै.सम्राटचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी संभाजी कांबळे हे उस्माननगर ता.कंधार येथे अत्यंत गरीबी परिस्थितीवर मात करत समता माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर येथे आपले माध्यमीक पर्यन्तचे शिक्षण पूर्ण केले आणि त्याच शाळेत ऑगस्ट 1986 मध्ये सेवक म्हणून नोकरी स्विकारली आणि नऊ वर्षे सेवक म्हणून काम केल्यानंतर याच शाळेत त्यांना वरिष्ट लिपिक म्हणून पदोन्नति मिळाली आणि या पदावरही ते इमानदारीनी सेवा बजावत 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज 30 सप्टेंबर 2022 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
घरी आई वडील मोल मजुरी, भाजीपाला विकुन आपला उदरनिर्वाह चालवत असत.त्यामूळे त्यांना शिक्षण चालू असतानाच सेवकाची नोकरी स्विकारावी लागली.शिक्षणाची आवड असल्याने नोकरी करत त्यांनी आपले एम.ए. पर्यन्त शिक्षण पूर्ण केले.
समाज सेवेची आवड असल्याने बहुजनाचा बुलंद आवज दैनीक सम्राट या पेपर मध्ये उस्माननगर येथून पत्रकारितेला सुरुवात केली.येथेही अपल्या कामाचा ठसा निर्माण केला. आणि ते या पेपरचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून येथेही पदोन्नति मिळवली.आणि या माध्यमातून सामजिक कार्य करत अन्यायाला वाचा फोडण्याचे काम ते करत असून ते सध्या दैनिक सचम्राटचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून प्रामाणीकपणे काम करत आहेत.