
दैनिक चालू वार्ता
नंदूरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार :आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र शासनाकडील विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेतीला पाणी पुरवठा करण्याकरीता बोअरवेल / विहीर निर्मिती करुन सोलर पंप बसविणेसाठी तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याकडून 30 नोव्हेंबर 2021 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहे.
योजनेसाठी अर्जासोबत जातीचा दाखला, वनहक्क 2006 कायद्याद्वारे वनपट्टा दाखला, यापुर्वी या योजनाचा लाभ आदिवासी विकास विभाग अथवा अन्य विभागामार्फत न घेतल्याचे प्रमाणपत्र, बोअरवेल, विहीर प्रस्तावित केलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे भूजल सर्व्हेक्षण विभागाचा दाखला, आधार कार्ड, दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) दाखला, दिव्यांग दाखला, विधवा, परितक्त्या असल्याचा दाखला, ग्रामसभा ठराव, रहिवास दाखला, बॅक पासबूक, अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
अधिक माहिती व अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा जि. नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.