दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
इस्लापुर येथे मा.क.पा.च्या वतिने शहीद भगतसिंग जंयती साजरी
शोषनमुक्त समाजाचे स्वप्न उराशी बाळगुण ब्रिटिश साम्राज्यावादाच्या विरोधात हसत हसत बलिदान देणाऱ्या शहीद भगतसींगाच्या स्वप्नातील भारत हे युवकच साकार करु शकतात शोषनमुक्त समाज,कष्टकरी गरीबांच राज्य, आणि समाज व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी युवकांनी पुढे यावे असे अव्हान यावेळी बोलतांना किसान सभेचे राज्य कार्यध्यक्ष काॅ.अर्जुन आडे यांनी व्यक्त केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तथा युवा फेडरेशन च्या वतिने इस्लापुर येथे शहिद भगतसिंग जंयती साजरी करण्यात आली. जयंतीच्या निम्मित्ताने कोसमेट ते इस्लापुर भगतसिंग विचार जागर बाईक रॅली काढण्यात आली, रॅलीचे समारोप साई मंगल कार्यलय इस्लापुर येथे करण्यात येऊन अभिवादन सभा घेण्यात आली, शहीद भगतसींगाच्या प्रतिमेला वंदन करुन सभेस सुरुवात केले.सभेला मार्गदर्शन काॅ.खंडेराव कानडे,काॅ.शेषराव ढोले, काॅ.आनंद लव्हाळे ,काॅ.स्टॅलिन आडे,काॅ.विजय जाधव,काॅ.इरफान पठाण यांनी मार्गदर्शन केले .
बॉईक रॅली आणि अभिवादन सभेते परीसरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतले
जंयती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल आडे,शिवाजी किरवले,सुभाष आडे,राम कंडेल, किशन देशमुख,समिर पठाण, ब्रम्हा ऐकुलवार, शिवाजी आडे, योगीराज जाधव, बाबु गाडेकर,धनलाल राठोड, लिंबाजी ढोले ,मांगीलाल राठोड आदींनी मेहनत घेतली.
( रावसाहेब कदम )