दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – शेलवाडी येथील तुळजाई ग्रामविकास संस्थेचे सचिव तथा केंब्रिज ज्युनियर कॉलेज वसमत चे संस्थापक माननीय प्रा. पुंडलिक नारायण बहिरे यांनी बाराशिव हनुमान ज्युनिअर कॉलेज जवळाबाजार हिंगोली येथे 21 वर्ष अध्यापनाचे अतिशय प्रामाणिक कार्य करून शांत ,संयमी , विद्यार्थी प्रिय , शिक्षण क्षेत्रातील महामेरू अशा अनेक उपाध्या मिळवलेले प्रा. बहिरे सर यांनी 21 वर्षाच्या ज्ञानदानाच्या प्रदीर्घ सेवेनंतर श्वेच्छा सेवा निवृत्तीचा निर्णय घेतला. या त्यांच्या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मंडळी आवाक झाली असून शिक्षण क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे अशी चर्चा सर्वत्र होत आहे आणि त्यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीच्या निर्णयामुळे त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवराकडून देण्यात येत आहेत.
1992 च्या दहावी वर्गातील विद्यार्थ्याला शिकवलेल्या गुरुजनांच्या व सर्वच वर्गमित्राच्या व मैत्रिणीच्या वतीने तसेच प्रा. पुंडलिक नारायणराव बहिरे सरांनी ज्यांना ज्यांना शिकवले आहे अशा सर्व माजी विद्यार्थ्यां च्या वतीने प्रा. बहिरे सरांचा सू हृदय पूर्ण अंतर्मनातून व अंतकरणातून हृदयस्पर्शी सत्कार केला.
प्रा.पुंडलिक नारायण बहिरे यांनी 21 वर्षाच्या प्रदीर्घ ज्ञानदानाच्या सेवे सोबतच तुळजाई ग्रामीण विकास संस्था शेलवाडी संचलित तालुका वसमत येथे केंब्रिज ज्युनिअर कॉलेज ची स्थापना करून या संस्थेचे सचिव म्हणून कार्य पाहत असताना त्यांनी अनेक कुटुंबांना नोकरीच्या माध्यमातून नव संजीवनी देण्याचे अतिशय मोलाचे कार्य केले आहे जवळपास त्यांच्या संस्थेमध्ये 60 कर्मचारी सेवेत असून 60 कर्मचाऱ्यांचे कुटुंब व कुटुंबातील सर्व सदस्यांची उदरनिर्वाहाची जबाबदारी पूर्णतः सक्षमपणे सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे नाही तर पूर्णतः तो सोडविलाच आहे.
प्रा. पुंडलिक बहिरे सर एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले असून त्यांनी अतिशय जिद्दीने , कष्टातून व मेहनतीतून स्वतः शिक्षण तर घेतलेच परंतु त्यांच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वसमत पंचक्रोशीतील हजारो गोरगरिबांच्या शिक्षणाचा विडा त्यांनी हाती उचलला एवढेच नव्हे तर या शिक्षण संस्थेमध्ये उच्चशिक्षित गोरगरीब तरुणांना सेवेची संधी देऊन त्यांच्या उज्वल भविष्यांची नांदी ठरण्याचे महत्त्वाचे कार्य प्रा. पुंडलिक बहिरे सरांनी केले.
त्यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्ती निर्णयामुळे हृदय पूर्ण सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य आनंद कदम , श्री पुरुषोत्तम संगेवार , उप मुख्याध्यापक पंडितरावजी मोरे , सहशिक्षक जाधव सोपानराव तसेच जाधव बालाजीराव यांचा सुध्द -हदयपूर्ण सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी 1992 च्या दहावी वर्गात शिकणाऱ्या सर्व वर्ग मित्राच्या वतीने आमचे मित्र असा आपुलकीचा व जिव्हाळा जिव्हाळ्याचा गौरवूद्गार काढून प्रा.पुंडलिक बहिरे यांच्या विषयी कृतज्ञता बाळगून त्यांच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक मते मांडण्यात आली त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला यावेळी पावडेवाडी चे सरपंच माननीय बंडूभाऊ पावडे तसेच प्रा.महेश मोरे सर , प्रा.रामा सोनटक्के सर , नंदकिशोर मोरे सर , अवधूत भारती सर , नामदेव शिंदे सर , नामदेव कदम सर , प्रशांतजी कुरुडे सर , विजया मोरे मँडम , मंगल पंडित मँडम , सुनिता येमेकर मँडम इत्यादी सह बाराशिव हनुमान ज्युनिअर कॉलेज जवळाबाजार जिल्हा हिंगोली चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते तसेच तुळजाई ग्रामीण विकास संस्था शेलवाडी संचलित केंब्रिज ज्युनिअर कॉलेज वसमत चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या गीताने झाली आणि कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला स्वेच्छा सेवानिवृत्ती सोहळ्याचा हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती असा झाला या कार्यक्रमात प्राध्यापक पुंडलिक बहिरे सरांसाठी पुढील वाटचालीस सर्वांच्या वतीने सर्वांगीण शुभेच्छा देण्यात आल्या.