दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश माने
शिवसेना हिंदू गर्व गर्जना निमित्त जालना शहरात मोटरसायकल रॅली करण्यात आली होती तसेच जालना येथील शिवसेनेची संपर्क यात्रेत मा. ना. अब्दुलजी सत्तार, अर्जुन खोतकर, उपनेते विजयजी नाहटा, खा. हेमंतजी पाटील यांनी शिवसैनिक व युवासैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी अभिमन्यू अर्जुनराव खोतकर, पंडित भुतेकर, भाऊसाहेब घुगे, आत्मानंद भक्त, फिरोज लाला तांबोळी, बाबासाहेब इंगळे, संतोष मोहिते, मेघराज चौधरी, दिनेश भगत, अमोल राऊत, ऍड. भास्कर मगरे, योगेश रत्नपारखे, सविताताई किवंडे, विजयाताई चौधरी, शिवसेनेचे नगरसेवक, महिला आघाडी, तालुका प्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.