
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
7 नोव्हेंबर 1900 मध्ये विश्वरत्न, भारतीय संविधान निर्माते महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इयत्ता 1ली च्या वर्गात (रजिस्टर नं.1914) सातारा येथील सरकारी शाळेत(प्रतापसिंह हायस्कूल सातारा) प्रवेश घेतला.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण व्हावे.विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावे व शिक्षण हेच उन्नतीचे साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी *महाराष्ट्र शासनाने 2017 सालापासून 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला आहे*.
त्या अनुषंगाने जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा केंद्र कोशिंबी ता.भिवंडी जि.ठाणे येथे दि.7 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 11-00 वाजता विद्यार्थी दिवस शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करण्यात आले.
*प्रथम महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक म्हसकर यांनी पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन माजी अध्यक्ष अशोक म्हसकर यांनी केले.
सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी विद्यार्थी दिवसाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेतले पाहिजे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी असताना 18-18 तास सतत अभ्यास करत असत.त्यामुळेच ते उच्च शिक्षण घेऊन अनेक महत्वाच्या पदव्या घेऊ शकले.तसेच जगात विद्वान म्हणून मान मिळवला.व आपल्या देशाचे मानव कल्याणकारी संविधान लिहू शकले.तुम्ही सुद्धा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून उच्च शिक्षण घेतले पाहिजे.असे मार्गदर्शनपर विचार मांडले.
उपस्थित विद्यार्थ्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी मुख्याध्यापक जगदीश जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे ,माजी अध्यक्ष अशोक म्हसकर, सहशिक्षक अशोक गायकवाड व विद्यार्थी उपस्थित होते.