
दै चालू वार्ता खंडाळी प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी :- दि :२१/१०/२०२१ रोजी माझ्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ करून मला व माझ्या पत्नीस मारहाण करून जिवे मारण्याचे धमकी दिले बाबत.
अर्जदार वसंत रामकिशन धनासुरे रा.गुरधाळ (हेर) ता देवणी जि.लातुर
आज रोजी (सकाळी 11 वाजण्याचा दरम्यान मी व माझी पत्नी मुलाबाळासह घरामध्ये होतो त्यावेळी माझ्या पत्र्याच्या घरावर दगड पडत असल्यामुळे मी व माझी पत्नी धराबाहेर येवून पाहिलो असता माझा माऊ विश्वंभर रामकिशन धनासुरे हा माझ्या अंगावर दगड फेक करीत होता. मी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केलो असता विश्वभर यानी मला वाईट शब्दात शिवीगाळ केला व माझ्या सोबत झटापटी करू लागला त्याने त्याच्या नखाने माझ्या छातीवर ओरखडून रक्ताची जखम केलेली आहे. तसेच माझ्या गळ्याभोवती नखाने जखमा केलेले आहेत. त्यावेळी माझी पत्नी सोडविण्यास आली असता त्यांनी माझ्या पत्नीसह केसाला धरून मारहाण केला व घाण शब्दात शिवीगाळ केली व तु माझ्या विरोधात न्यायालयात दाखल केलेली केस उचलून घे म्हणुन मला जिवे मारण्याची धमकी देत होता माझ्या जिवीतास त्याच्यापासुन धोका आहे. त्यामुळे त्याच्यावर योग्यते कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व तसेच मला गळ्याभोवती दोन ठिकाणी लागले असून माझ्या डोक्यामध्ये दगड घातला आणि मी पुढील उपचारासाठी उदगीर शासकीय रुग्णालयात ट्रीटमेंट साठी ऍडमिट आसता मला उदगीर वरून पुढील उपचारासाठी लातूर येथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतला आणि माला मार लागलेला असून देउनी पोलिस स्टेशन पंचनामा न करता मला फोन करत असता की केस मितवायच्या का काय करायचं आहे असे भाषांमध्ये मला फोन वर बोलत होते . आणि दि ,२१/१०/२०२१ रोजी माझा अर्ज देवणी पोलीस स्टेशन मध्ये घेतला असता तर दि ,२२/१०/२०२१ रोजी माझ्यावर दगड फेक वार झाला नसता
अर्ज देण्यास पोलिस स्टेशन देवणी येथे गेलो असतांना माझा अर्ज बदलून देण्याचे सांगितले व माझा दिलेला अर्ज ठाणे हवालदार यांनी स्वतः जवळ ठेवून घेतला मी अर्ज बदलुन न दिल्यामुळे त्यांनी मला माझा अर्ज परत दिला नाही व मला त्याची पोचही दिली नाही. याउलट ठाणे हवालदार यांनी आम्हाला धमकी देवुन ठाण्यातून परत पाठवुन दिले आणि दि,२१/१०/२०२१ रोजी माझा अर्ज घेतला असता तर दि २२/१०/२०२१ रोजी माझ्यावर झालेला वार टळला आसता. आरोपीस अटक करून योग्य ते कार्यवाही करण्यात यावे