दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:अडत व्यापारी शिक्षण संस्था संचालित देगलूर महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेच्या समितीद्वारे प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन करण्यात आले.
यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या मूल्यांकनात महाविद्यालयास बी प्लस प्लस चा दर्जा प्रदान करण्यात आला होता. महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगाणा या तीन राज्याच्या सीमावर्ती भागातील मुलामुलींना उच्च शिक्षण देणारे ग्रामीण महाविद्यालय पाहून समितीने समाधान व्यक्त केले. मूल्यांकन कार्याच्या पूर्वतयारीसाठी व महाविद्यालयातील सर्व विभाग व परिसर अद्ययावत करण्यासाठी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार, उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सूर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, , डॉ कर्मवीरकेले. मूल्यांकन कार्याच्या पूर्वतयारीसाठी व महाविद्यालयातील सर्व विभाग व परिसर अद्ययावत करण्यासाठी अडत व्यापारी शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार, उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सूर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उग्रतवार, जनार्दन चिद्रावार, गंगाधर जोशी, रवींद्र धाडे, देवेंद्र मोतेवार, चंद्रकांत नारलावार, प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक, कर्मचारी, आजी व माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.