दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड – गोविंद पवार
लोहा : – सामाजिक शैक्षणिक कार्यात सतत धडपड करणारे शिक्षणप्रेमी , स्वच्छताप्रेमी , वृक्षप्रेमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावरी येथील मुख्याध्यापक बालजी चव्हाण सर यांना भाद्रा येथील शिक्षण परीषेदेत कै डॉ शंकराव चव्हाण ज्ञानरत्न पुरस्कार नांदेड दक्षिणचे आ मोहन आण्णा हंबर्डे , माजी आमदार रोहिदास रावजी चव्हाण , जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे गटशिक्षण अधिकारी रवींद्र सोनटक्के , नगरसेवक संभाजी चव्हाण , शिक्षक काँग्रेसचे राज्य कोषाध्यक्ष प्रकाशजी मुंगल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सरस्वती अंबालवाड, केंद्रप्रमुख श्री मदन नायके केंद्रीय मु.अ.चंपतराव सावळे सर,शिक्षक ,जिल्हा सल्लागार बाबुराव कैलासे ,शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, जय महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर पवार
सायाळचे सरपंच अन्नाराव पवार पांगरीचे सरपंच भरत कोपनर,उपसरपंच माधव पा.बुद्रूक,शा.व्य.स.पांगरी अध्यक्ष भारत पवार,माऊली पा बुद्रुक ,भाद्रा शा.व्य.समिती अध्यक्ष अंकुश चिंचोरे उपाध्यक्ष मुंजाजी चिंचोरे भाद्रातांड्याचे शा.व्य.समिती अध्यक्ष राजेश पवार,सरपंच प्रतिनिधी शेषराव पा.चिंचोरे,केशव पा.पवार संग्राम पा.चिंचोरे,खंडू पा.पवार,मारोतराव पा.पवार,रेषमाजी चिंचोरे संभाजी पा.पवार,अर्जुन पावार,ऊत्तमराव पवार,भिमराव पा.पवार,श्रीकांत चिंचोरे भगवान पानपत्ते आनेक मान्यवरांच्या व शिक्षण प्रेमी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. लोहा येथील पञकार विलास सावळे विनोद महाबळे दैनिक चालु वार्ताचे उपसंपादक गोविंद पा पवार प्रेस पञकार संघाचे तालुकाध्यक्ष शिवराज पा पवार , यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा भाद्रा , भाद्रा तांडा , जिल्हा परिषद शाळा पांगरीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास मुख्याध्यापक विठुभाऊ चव्हाण , मुख्याध्यापक बटलवाड सर भाद्रा तांडा येथील मुख्याध्यापक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात शानदारपन्ने संपन्न झाला.