दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कलंबर :- कंधार व लोहा तालुक्याचे आराध्य दैवत महान तपस्वी श्री संत योगीराज निवृत्ती महाराज आणि श्री संत मोतीराम महाराज यांचे नांदेड ते बिदर रोडच्या जवळच भव्य दिव्य मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. असून दि. २ आॅक्टोबर रविवारी शिल्पकार माणिक कदम आणि घूगे साहेब माळाकोळीकर यांना एक लाख एकत्तीस हजार रुपये देण्यात आले. तसेच श्री. संत योगीराज निवृत्ती महाराज, श्री संत मोतीराम महाराज यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन नांदेड बिदर रोडच्या बाजूला करण्यात आले. भक्तमंडळीना कळविण्यात येते की मंदिराचे अजून बरेच काम बाकी राहीले असून मंदिरासाठी देणगी देऊन सहकार्य करावे असे विश्वस्त मंडळाच्या पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे. निसर्ग रम्य परिसर, ताज्या काळ्याझर पाण्याचे झरे, नयनरम्य प्रेक्षक स्थळे आहेत तेंव्हा भक्त मंडळींनी दोन्ही संताच्या दर्शनासाठी यावे . यावेळी माजी सरपंच रावसाहेब पाटील भोपाळे,माधवराव पाटील, सोपानराव पाटील, सुरेश पाटील घोरबांड सर, प्रभाकर पाटील, शिवाजी घोरबांड, बंटी पाटील इंगोले, संभाजी कोठेवाड उपस्थित होते.