दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी मुंबई– जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून जेष्ठ सेवा भावी संस्था,घणसोली,नवी मुंबई,सेक्टर १५मध्ये संस्थेतील वयाची ७५वर्षे पूर्ण केलेल्या तसेच ज्यांचे जेष्ठ नागरीक दिना दिवशी वाढदिवस अशा जेष्ठ नागरीकांना संस्थेचे अध्यक्ष भास्कर आव्हाड,सचिव उत्तम बनसोडे,उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड,कोषाध्यक्ष श्री.रणपिसे,महादेव शिंदे,दत्तात्रय कुंभार यांच्या शुभ हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.बापु सखाराम भिसे ७९वर्षे,सदाशिव सीताराम शेट्ये ७७वर्षे,बबन नथू जाधव ७६वर्षे,बाळकृष्णन ७६वर्षे,बाळकृष्ण रामचंद्र कुलकर्णी ७६वर्षे व बाळकृष्ण साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभासाठी जेष्ठ नागरीक सेवाभावी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य,सदस्य व ओम साई माॅर्निंग ग्रुपचे मान्यवर पदाधिकारी व सदस्य असे एकूण ६०जण उत्साहाने सहभागी झाले होते. सर्वांनी सत्कार मूर्तींना उदंड व निरोगी आयुष्य व सुख शांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.त्यानंतर जेष्ठ नागरिक संस्थेचे पदाधिकारी बाळकृष्ण घाडगे यांनी सर्वांचे कौतुक व अभिनंदन करुन आभार मानले. शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.