दैनिक चालु वार्ता हातकणंगले प्रतिनीधी-
मौजे इंगळी गावातील पानंद रस्ते अंत्यत खराब व खाचखळगे पडलेने शेतकरी नागरीकांचे हाल होत आहे. दैनिक पेपरच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवल्यामुळे आणि माजी.आमदार सुरेश हाळवणकर,भाजप प्रदेश उपाध्यक्ष यांचे खास.धैर्यशिल माने इंचलकरंची लोकसभा यांना गावातील पांनंद विविध रस्ते ,पैकी चांभारकी पानंद,तोडकर पांनद,जुना चाबूकस्वार रोड,लोकरे कोळी पानंद,राजू शेट्टी गोठा ते ऐतवडे मळा,कराडे पानंद,हुपरी शिव ते ओढा पानंद,करके पांनंद,सावकर मळा पांनंद,सोनारकी पानंद,चाबूकस्वार पांनंद,या पानंद रस्त्याचे निवेदन देण्यात आले. या पैकी जूना चाबुकस्वर रोड व लोकरे कोळी पानंद रस्ते तातडीने करण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यामुळे शेतकरी,नागरीकांचे हे पांनंद रस्ते झाल्यामुळे दिलासा मिळणार आहे.कवि सरकार व त्यांचे सहकारी शामराव भातमारे श्रीमंधर ऐतवडे,शिवाजी मगदूम,यांनी निवेदन देऊन पानंद रस्त्यांची मागणी केली असता लवकरच दोन पानंद रस्त्यांचे काम सुरू करू असे सांगितले आहे.