
वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात सुरू असलेल्या वादाला नवे वळण लागण्याची शक्यता
मुंबई – नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिची बहीण हर्षदा रेडकर हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर दाऊद वानखेडे तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ही ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेला आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.यासंदर्भात नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी विचारले की, समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्सच्या व्यवसायात सहभागी आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अवश्य द्यावं लागेल, कारण या प्रकरणातील खटला पुण्यातील कोर्टामध्ये प्रलंबित आहे. तसेच खालील कागदपत्रे त्याचा पुरावा आहे.
मुंबई ड्रग्स प्रकरणावरून समीर वानखेडेंविरोधात आक्रमक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोपांची मालिका कायम ठेवली आहे.
आपल्या आरोपांना पुरावा म्हणून नवाब मलिक यांनी काही कागदपत्रे शेअर केली आहेत. त्यामधून हर्षदा दीनानाथ रेडकर हिच्यावर पुण्यातील कोर्टात खटला सुरू असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. आता नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात सुरू असलेल्या वादाला नवे वळण लागण्याची शक्यता आहेत.