दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कसबेगव्हाण येथील अमर दामोदर दामले (वय-३२,रा.कसबेगव्हान) नावाच्या इसमाचा रात्रीच्या सुमारास कसबेगव्हान-कापुसतळणी मार्गावर दुर्दैवाने अपघात होऊन मृत्यू झाला.
माहितीप्राप्तीनुसार अमोल हा घरी परत येत असतांना कसबेगव्हान-कापुसतळणी मार्गावरील बावरीनबाईच्या नाल्यावर अपघात झाल्याचे गस्तावर असलेल्या चिंचोली रहीमापूर पोलीसांना दिसताच कसबेगव्हान गावातील विजय दामले यांना फोन करून कळविले व सदर इसमाची चौकशी केली असता नातेवाईकच असल्याचे विजय दामले यांनी पोलीसांना सांगितले.त्यानंतर मृत अमोल ह्याला शासकीय रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले असता आमदार बळवंत वानखडे यांना माहिती मिळताच शासकीय रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे धाव घेतली व सदर घटनेची विचारपूस करून तश्याप्रकारचे आदेश संबंधितांना दिले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सदस्य विदर्भकुमार बोबडे,सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे,कैलाश शिरसाट,अशोक मोरे,सावळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.