दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी डॉ. भागवंतराव बी.एन पाटील यांनी एम देवेंद्र सिंग यांना रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सपविला. सध्या राज्यांत शिंदे-फडवणीस सरकार असल्यांमुळे वरिष्ठ बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र मात्र सुरुच आहे. गुरुवारी उशिरा झालेल्या बदलांमध्ये राज्यांतील जवळपास ४४ बड्या वरिष्ठांच्या बदल्या करण्यांत आल्या. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी डॉ.भगवंतराव बी. एन पाटील यांच्या अवघ्या एका वर्षातच रत्नागिरी जिल्हाधिकारी पदावरुन त्यांचे नांदेड-वाघाळा महापालिकेत आयुक्त पदावर नियुक्ती करण्यांत आली. बी एन पाटील यांच्या जागेवर पुणे येथे असलेल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक म्हणून देवेंद्र सिंग कार्यरत होते. त्यांनी नुकताच भागवंतराव बी. एन पाटील यांच्याकडूंन रत्नागिरी जिल्ह्यांची जबाबदारी स्वीकारली. रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी पदभार घेताच पुढे म्हणाले… मी सोमवारपासून मी विविध विभागांच्या बैठका घेणार आहे या बैठकांमधून प्रत्येक विभागांचा मी आढावा घेईन आयुष्मान भारत हे केंद्र सरकारची योजना आहे त्या योजनेच्या अंमलबजावणी बाबत माहिती घेणार आहे महाराष्ट्रांतील सर्व जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा कोठे आहे? याचा आढावा घेणार असल्यांचे नूतन जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. देवेंद्र सिंग यांनी यापूर्वी बीड आणि यवतमाळ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी पद भूषविले आहे. लातूर महानगरपालिकेमध्ये ते आयुक्तही होते. गेली ११ त्यांची सेवा झाली. असून ते एमबीए आहेत कॅम्पुटर सायन्समध्ये त्यांनी शिक्षण घेतले आहे. यापूर्वी ते पुणे येथे एमएसआरटी मध्ये ते संचालक म्हणून कार्यरत होते. जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग म्हणाले की आज पहिल्यांच दिवशी मी रत्नागिरी जिल्ह्यांतील काही महत्त्वांच्या गोष्टींबाबत माहिती घेतली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यांचे माजी जिल्हाधिकारी डॉ. भगवंतराव बी.एन पाटील यांचा एक वर्षाचा जिल्हाधिकारी पदाचा कार्यकाळ त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यांसाठी चांगलाच राहिला. रत्नागिरी जिल्ह्यांचे नूतन जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकारी असल्यांचे बोलले जात आहे. देवेंद्र सिंग यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून शनिवारी पदभार स्वीकारताच सोशल मीडियावरुन सातारा जिल्ह्यांचे विद्यमान पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांनी देवेंद्र सिंग साहेबांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.