दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा – आदिशक्ती आई काळंकाई माता हे पांगरीचे वैभव आहे असे प्रतिपादन विनोदाचार्य श्री ह भ प काशीनाथ महाराज माने यांनी नवराञ महोत्सवातल्या काल्याच्या किर्तनात श्रोत्यांना प्रतिपादन केले. आदिशक्ती आई काळंकामाई मातेचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले प्राचीन मुर्ती व आईचा आजचा अलंकाराचा पेराव पाहुन यावेळी मला आई कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन झाले असे प्रतिपादन काशीनाथ महाराज माने यांनी यावेळी केले.
नवरात्र महोत्सव हा नुसता डिजे लावुन जल्लोषात न करता आईचा जागर , गोंधळ , किर्तन सोहळा , गौळणी , अभंग असे विविध प्रकारचे लोकजागृती करण्याचे कार्यक्रम ठेऊन साजरा करावा.
माणसं माणुसकी विसरायला लागले या जगात कुणी कुणाचे नाही आजचा बालक नागरीक आहे आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या , वाईट व्यसन करु , हिंदू सण संस्कृतीचे जतन करा , आपल्या मुलांना हातात मोबाईल देण्यापेक्षा हरीपाठ , ज्ञानेश्वरी , गाथा , वाचवायला द्या कारण संतकाव्य संतमहीमा , अभ्यास केलेले मस्तक कोठे झुकत नाही व आपल्या मुलांना संस्कार पण चांगले लागतात.
आदिशक्ती आई काळंकाई माता हि खुप प्राचीन देवी आहे. गावच ग्रामदैवत आहे व परीसरात नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती आहे. अशाच पध्दतीने दरवर्षी हा नवरात्र महोत्सव दरवर्षी करावा असे प्रतिपादन यावेळी श्री ह भ पण काशीनाथ महाराज माने यांनी केले.
या किर्तनसेवेला मृदंगाचार्य श्री ह भ प प्रमोद महाराज चोडीकर , गायणाचार्य , पप्पू महाराज पोले , गणेश महाराज माळेगावकर , गावचे भुमिपुञ श्री ह भ प कृष्णदास महाराज आयोजन मंडळी आदिंची उपस्थिती होती.