
दै चालु वार्ता
प्रतिनिधी नांदेड (विश्वास खांडेकर)
नांदेड शहर तसे पाहावे तर फार मोठी आहे आणि या शहरांमध्ये इतर शहराप्रमाणे आपल्याला जागोजागी सिग्नल सुद्धा दिसून येतील. या सिग्नल चा उपयोग रहदारी नियंत्रण करण्यासाठी होत असला तरी हे दृश्य नांदेडला उलट दृष्टीने पहावयास मिळते .कारण नांदेड चे सिग्नल म्हणजे देखाव्यासाठी उभा केले आहेत की काय असे आपल्याला म्हणावे लागेल.
नांदेड शहरात दहा पेक्षा अधिक जास्त सिग्नल आपल्याला पहावयास मिळतात पण त्यापैकी जर वजीराबाद चौकातील आणि आयटीआय चौकातील सिग्नल व्यवस्थित रित्या काम करत असलेले पहावयास मिळतात .बाकीच्या ठिकाणी नुसती डोके दुखी . कारण सिग्नल पिवळा असो की हिरवा असो की लाल रहदारी आपल्या मनाने चालू आहे असे दिसून येते .खासकरून अण्णाभाऊ साठे चौकातील सिग्नल हा नांदेड शहरातील सर्वात मोठा सिग्नल आहे. आणि जेवढा मोठा आहे तेवढेच डोकेदुखी सुद्धा फार मोठी आहे, कारण या सिग्नल वरून जाताना तुम्ही कितीदाही ये जा करा चौकाला वाटलंच गोल रिंगण मारा, ट्राफिक पोलीस असुद्या कि कोणी असू द्या पण तुम्हाला कोणी आडवणारच नाही .मग तुमच्यामुळे कितीही ट्राफिक जरी जाम झाली तरी तुमच्याकडे कोणी लक्ष देणार नाही ,कारण इथे उभा असणारे पोलीस ‘तो मी नव्हेच ‘या अविर्भावात जनु उभे असतात. आपण स्वतः जरी त्यांना जाऊन सांगितलं तरी ‘तुम तुम्हारा काम करो’ अशी उत्तरे देखील ऐकायला येतात. येथील वरीष्ठांचे लक्ष फक्त स्वतःकडे आहे, त्यांना याचे घेने देने नाही.स्वतः जरी या सिग्नल वरून जात असतील तरी त्यांच्यापुरती जागा मिळते का एवढेच ते पाहतात बाकी ‘भाड मे जाये जनता’ असेच दिसून येते ही अवस्था फक्त अण्णाभाऊ साठे चौकातील नसून यशवंत कॉलेज कडे जाणारा रोड वर असणाऱ्या सिग्नलचीही तीच अवस्था आहे.
चिखलवाडी कॉर्नरच्या सिग्नलची अवस्था फारच वाईट आहे. येथे एकेरी प्रवासाचा मार्ग आहे ,परंतु उलट दिशेकडून येणारी वाहने तुम्हाला जास्त पहावयास मिळतील .पोलीस या वाहनांना लक्ष सुद्धा देत नाहीत मग कारवाई करायची तर दूरच राहू देत. यामुळे अनेक अपघाताच्या घटना देखील घडून येतात,या सीग्नलची अवस्था म्हणजे वजिराबाद पोलिस स्टेशनच्या अगदी जवळ असून देखील हा चिखलवाडी सिग्नल लोकांचे डोकेदुखी बनून बसला आहे. वाहतूक शाखेने नांदेडकडे अगदी दुर्लक्ष करून ठेवले आहे आता यावर जाब तरी कोणाला विचारावा आपले म्हणणे तरी कोणाकडे मांडावे अशी अवस्था पहावयास मिळत आहे.
बाजूच्या फोटोमधील चित्र तुम्हाला पहावयास मिळत आहे सीग्नल लाल आहे परंतु चारी दिशेने गाड्या आपले आपले मार्गक्रमण करीत आहेत जणू असे वाटत आहे सिग्नल कोणी पाहतच नाहीये की काय? किंवा तो मिस्टर इंडिया झाला आहे की काय? यावरून नांदेडच्या रहदारीची अवस्था आपल्या लक्षात येते. आणि येथील कारभार देखील आपल्या लक्षात येतोच आता तुम्हीच ठरवा सिग्नल ठेवायचे काढून टाकायचे?