
दैनिक चालू वार्ता शिराढोण सर्कल प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी मौजे कासारखेडा येथे *राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ मूल्य साखळी विकास योजना सन 2022-23 अंतर्गत शेतीशाळा *शेतीदिन* शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन *जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे* यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर भाषणातून तालुका कृषी अधिकारी नांदेड – सिध्देश्वर मोकळे यांनी खरीप हंगामामध्ये प्रकल्पांतर्गत राबवलेल्या बाबींचा ऊहापोह करून प्रकल्प चांगल्या प्रकारे राबविल्या चे सांगून गावकऱ्यांचे प्रकल्प राबविताना केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. व सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील उत्पादित सोयाबीन हे पुढील हंगामासाठी आतापासूनच नियोजित बियाणे बीजोत्पादन म्हणून साठवावे. भेसळ होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे बियाणे खरेदीचा खर्च कमी होईल असे प्रतिपादन केले.
कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ देविकांत देशमुख यांनी कासारखेडा गावातील तरुण शेतकऱ्यांनी बी बी एफ व टोकण पद्धतीने व नवीन तंत्रज्ञान वापरून केलेल्या सोयाबीन लागवड बाबत प्रशंसा करून यापुढेही सुशिक्षित तरुणाने शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन कमी पाणी व जमिनीचा वापर करून स्मार्ट शेती करावी असे सांगून तरुण सुशिक्षित वर्ग शेतीकडे वळत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
मंडळ कृषी अधिकारी लिंबगाव – प्रकाश पाटील सर यांनी ऊस बेणे निवड, लागवड पद्धती, सोयाबीन व इतर शेतमालाचे मूल्यवर्धनसाठी शेतकऱ्यांनी आपली प्रक्रियायुक्त मूल्य साखळी तयार करावी असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कासारखेडा गावचे कृषि सहायक – वसंत जारीकोटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन दशरथ आढाव यांनी मानले.
सदरील शेती दिन कार्यक्रमासाठी मंडळ कृषि अधिकारी नांदेड- सतिश सावंत , कृषि सहायक – रमेश धुतराज , सरपंच प्रतिनिधी तानाजी शिंदे, चंद्रशेखर शिंदे, अश्विन शिंदे, व्यंकटराव शिंदे, साहेबराव शिंदे, ग्राम पंचायत सदस्य योगाजी देशमुख, भिमा हिंगोले, रावसाहेब कडेकर, शिवदास कडेकर, सुरेश हिंगोले, राजाराम शिंदे, किशोर शिंदे, शहाजी शिंदे आदीसह मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली.