
दै चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी:- सुशिल घायाळ
दि.6नोव्हेंबर2021(मंठा )तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत उपसरपंच अविनाश राठोड यांना सामाजिक व कोरोना काळात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सरपंच सेवा संघाकडून दिल्या जाणारा 2021 चा राज्यस्तरीय कोरोना युद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.,हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम श्री.भगतसिंग कोश्यारीया यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
अविनाश राठोड यांनी गाव पातळीवर कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण गावाचे 100% लसीकरण केले,जे रुग्ण कोरोना बाधित झाले होते त्यांना कोविड सेंटर किंवा हॉस्पिटल ला पाठवणे त्यांना नियमित संपर्क मोबाईल द्वारे त्याचे मनोबल वाढविने आणि ताकद देण्याचे काम त्यांनी केले.
गावामध्ये 550 लोकांचे rt-pcr टेस्ट करण्यात आल्या, त्यातील एकाही वक्ती कोरणा पॉझिटिव आढळलेला नव्हता., तिसऱ्या लाटेला हद्दपार करण्यासाठी लहान बालकाचे व गरोदर माताचे संरक्षण करणे गरोदर मातांना सकस आहार देण्याचे काम सुद्धा त्यांनी केले.
नियमित मंठा गटविकास अधिकारी प्रशांत रोहनकर,तत्कालीन तालुका आरोग्य अधिकारी दीपक लोने इतरांचे मार्गदर्शनामुळे त्यांनी गावांमध्ये धूर फवारणी, प्रभातफेरी, मास्क आणि सॅनिटाझर वाटप, मोफत रोगनिदान शिबिर,आहार वाटप,पटनाट्य माध्यमातून जाणीव जागृती, ई,उपक्रम त्यांनी हाती घेतले.
विविध पथकाला सोबत घेऊन गावातील प्रत्येक कुटुंबाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, लसीकरण पथक हाती घेऊन जास्तीत जास्त लसीकरण करून घेणे, वाहन पथकाच्या मार्फत रुग्णांना हॉस्पिटल किंवा कोविड सेंटरला पाठवणे, विलगीकरण पक्ष स्थापन करणे त्याची देखरेख करणे,कोविड हेल्पलाइन पथकाद्वारे नागरिकांमध्ये जाणीव जागृती करणे, इतर उपक्रम त्यांनी हाती घेतलेले दिसते.
हे पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे माजी मंत्री बबनराव जी लोणीकर,महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चाचे महामंत्री राहुल लोणीकर, शंकरराव खेनकर, जयदीप वानखेडे, बाबासाहेब पावसे, भाऊसाहेब मरगळे, गजानन फुपाटे, बाबासाहेब गवळी इतरांकडून अभिनंदन होत आहे.