
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मिशन आजादक्रांती सेनेच्या वतीने घेण्यात आला कार्यक्रम
मंदिर प्रतिनिधी:- सुशिल घायाळ
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिवाळीच्या सनामध्ये येणाऱ्या दिवसांपैकी बलिप्रतिपदा यादिवशी सम्राट बळीराजा यांचा गुणगौरव करण्यात येतो. या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या चार ते पाच वर्षांपासून सतत राम महाराज नालेगावकर यांच्या संस्थेवर संघटनेच्यावतीने घेण्यात येतो. याहीवर्षी बळी पूजनाचा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तालुका पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष रंजीत दादा बोराडे,सुनील शेरे,
पत्रकार सुभाष वायाळ सर, रामेश्वर महाराज,कांगणे महाराज, रफिक सर सय्यद, सुशिल घायाळ, श्रीधर इंगळे महाराज, भगवान शिंदे, उस्माण पठाण, बंडू नाना बोराडे, कृष्णा पोपटे, गजानन महाराज ईलग, रुषभ माळोदे,व इतर मित्र परिवार उपस्थित होते.