दैनिक चालू वार्ता नांदेड – प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड– जिल्ह्यातील कंधार तालुक्यात अतिशय समृद्ध व विकसनशील गाव म्हणून कुरुळा सर्कल मधील दिग्रस ( बु.) या गावाचा उल्लेख आवर्जून केला जातो या गावांमध्ये सर्वच जाती धर्मातील अठरापगड जातीचे जवळपास 1000 घरे असून साधारणता गावची लोकसंख्या जवळपास 7000 एवढी असून त्यात बौद्धांची लोकसंख्या जवळपास एक हजार एवढी आहे 100 घराच्या बौद्ध वस्तीमध्ये अर्थातच प्रबुद्ध नगर मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय भव्य दिव्य दिमागदार स्मारक दिग्रस नगरीचे वैभव वाढवणारे राष्ट्रीय महामार्ग 50 वर थाटामाटात व दिमागदार पद्धतीने उभे आहे. या पूर्ण आकृती स्मारकाचे बांधकाम 2004 मध्ये सर्वच लहान , थोर , अबाल वृद्ध , तरुण तर्क बौद्ध अनुयायांच्या सहकार्यातून व गावकऱ्यांच्या मदतीने पूर्णत्वास गेले आहे.
त्याच अनुषंगाने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सर्व बौद्ध उपासकांच्या , लहान थोर आबाल वृद्धांच्या व तरुण तर्क युवकांच्या आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय जल्लोषात वर थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन प्रबुद्ध नगर मधील जेष्ठ नागरिक गोविंद गणपती कांबळे व माजी ग्रामपंचायत सदस्य माधव मोतीराम कांबळे व सेवानिवृत्त सहशिक्षक शंकर तुकाराम कांबळे तसेच दिग्रस नगरीच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. दिशा साहेबराव नाईकवाडे यांच्या हस्ते करण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती स्मारकास सचिन जारीकोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी सचिन जरीकोटे यांच्यासोबत त्यांचे मित्र सुद्धा उपस्थित होते . 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने सचिन जारीकोटे यांनी संपूर्ण प्रबुद्ध नगर मधील बौध्द अनुयायांसाठी व गावातील तरुण तर्क युवकांसाठी रुचकर , स्वादिष्ट भोजनाची उत्तम व्यवस्था करून दिली होती. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर संपूर्ण जाती-धर्मातील तरुण तडफदार युवकांनी व बौद्ध अनुयायांनी रुचकर व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.
याप्रसंगी श्री शिवाजी हायस्कूल कंधारचे सहशिक्षक संदीप शंकरराव कांबळे यांनी ” बौद्ध धम्म व धम्म प्रचार , प्रसार ” या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले तसेच श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड चे प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव यांनी ” भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व धम्मचक्र प्रवर्तन दिन ” या विषयावर मार्मिक असे विवेचन केले याबरोबरच प्रबुद्ध नगर मधील सर्वच बौद्ध अनुयायांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच त्रिशरण , पंचशील ,बुद्ध पूजा पाठ , बुद्ध वंदना , धम्म वंदना , संघ वंदना , भीम स्तुती व सरणतय गाथा सर्वांच्या तोंडुन सामुहिक पद्धतीने वदवून घेण्यात आली.
66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन तरुण तडफदार युवकांचे प्रेरणास्थान व महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही चे दिग्रस प्रतिनिधी राजू गोविंदराव कांबळे व प्रवीण गोविंदराव कांबळे तसेच अमोल श्रीरंग कांबळे व त्यांचे सर्वच मित्र मंडळ ( प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख न करता सर्वच ) यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिग्रस नगरीतील जाती-धर्मातील विविध कार्यक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेणारे सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक चालू वार्ता चे नांदेड प्रतिनिधी प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव यांनी केले.