
भिगवन प्रतिनिधि जुबेर शेख ✍️:
भैरवनाथ विद्यालय भिगवन येथील स्टेशन शाखेच्या मार्च 2003-04 साली इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थी यांचा स्नेह संम्मेलन मेळावा भिगवन स्टेशन येथील शाळेमधे संपन्न झाला.जवळपास 17 वर्षानी झालेल्या या भेटीमधे सर्व मित्रांनी आपापल्या आयुष्यात आलेले अनुभव एकमेका बरोबर वाटून घेतले आणि आयुष्यातील एक दिवस पुन्हा एकदा शालेय जीवन अनुभवले.
यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. सर्व विद्यार्थियांनी एकमेकांना भविष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्वांनी एकमेकांना निःसंकोचपणे मदत करण्याचा संकल्प केला. जवळपास 40-45 विद्यार्थी यांनी आपापल्या देनंदिन जीवनातून वेळ काढून मेळाव्याला हजेरी लावली.
या विद्यार्थी मेळाव्याची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुण करण्यात आली.प्रस्तावना महेश क्षीरसागर यांनी केली. कार्यक्रमाचे सर्व नियोजन मनोज चव्हाण, सुनील ढमढेरे, वसीम शेख यांनी केले. पांडुरंग सातपुते व निलेश दिवेकर यांनी सर्वांना मेळाव्यास येण्यास प्रोत्साहित केले. या कार्यक्रमास गावड़े सर ,करपे सर, घोड़े सर व शिरसट सर उपस्थित होते.माजी विद्यार्थी यांनी भैरवनाथ विद्यालय भिगवण स्टेशनच्या शाळे साठी स्व खर्चातून जी आत्ता काळाची गरज बनली आहे अशी वस्तु म्हणजेच CCTV सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाचे आभार मनोज चव्हाण यांनी केले.