दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर
अहमदपूर तालुक्यातील मौजे हिप्परगा (कोपदेव) येथे अंबिका माता नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने बब्रुवानजी खंदाडे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक भगवानराव पाटील हे होते तर सत्कार मुर्ती बब्रुवानजी खंदाडे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सिद्धार्थकुमार सुर्यवंशी (नगरसेवक, न.प.अहमदपूर) रामानंद मुंढे (वृक्ष मित्र), पारनाथ गुट्टे (माजी सरपंच, देवकरा), रघुनाथ मुंढे (माजी सरपंच, सताळा) मधुकरराव अंकुलगे आप्पा (जेष्ठ नागरीक) शिवाजीराव गोरटे (माजी सरपंच) गोविंदराव पाटील, दिलीपराव चोपडे, अनिलकुमार गोरटे, लक्ष्मणराव कदम, गोविंदराज लोहबंदे, केशव गोरटे, बिभिषण आगलावे, सुधाकर आगलावे, मधुकर केंद्रे, गुणवंतराव आगलावे, सुधाकर केंद्रे, विष्णू महाराज चोपडे, परशुराम कदम, सोनेराव गोरटे प्रल्हाद आगलावे, दत्ता आगलावे, माधव कदम, दिनकर आगलावे, खाजासाब शेख, मौलासाब शेख, विष्णू आगलावे, माधव डोंगरे आदीची उपस्थिती होती. यावेळी बोलताना बब्रुवानजी खंदाडे म्हणाले की, माझा पुनर्जन्म झाला आहे. मी यापुढे देवाने दिलेले बोनस आयुष्य म्हणून प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणार आहे.
तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबिका माता नवरात्र समितीचे अध्यक्ष श्री भगवानराव कदम, सचिव शरद गोरटे, कोषाध्यक्ष पवन कदम, कार्याध्यक्ष गोविंदराव कदम आदिनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचलन श्री. विष्णू महाराज चोपडे यांनी केले तर आभार गोविंदराव पाटील यांनी मानले